नागाव पूल धोकादायक, अपघात होण्यापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी


नागाव पूल धोकादायक, अपघात होण्यापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी.

अलिबाग : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दि.२६ जुन रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागाव पूल तातडीने दुरूस्ती करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी तालुका प्रमुख शंकर गुरव, उपजिल्हा संघटक अजित पाटील, जिल्हा प्रवक्ता विकास पिंपळे उपास्थित होते.

अलिबाग तालुक्यातील सहाण-नागाव मार्गाला जोडणारा नागाव पूल धोकादायक झाला असून पुलाचा दगडी बंधारा ढासळला आहे व त्यामुळे सदर पूल पडल्यानंतर पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी दुर्घटना घडू शकते, सदर पूल रेवदंडा-मुरुडकडे जाणारा असल्यामुळे पर्यटकांची वाहतूक पुलावरून होत असते, जर पूल पडला तर सहाण-नागाव-पाल्हे बायपास जाणाऱ्या नागरिकांना व आजू-बाजूच्या गावातील ग्रामस्थांचा संपर्क पूर्णपणे तुटेल. ऑगस्ट २०२६ महाड पुल दुर्घटनेची पुनरावृत्ती परत होवू नये त्याकरिता तातडीने पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, भविष्यात नवीन पुल बांधण्यात यावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Advertisement

*जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल मुख्य रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना खडसावल.*
चौल नाक्यावरील मुख्य रस्त्यातील फेवर ब्लॉक्स निघून रस्त्यात मोठ मोठाले खड्डे पडले आहेत, तर चौल कृष्णाई मंदिर जवळ रेलिंग बसवण्यात यावी, अनेक अपघात त्यावळणावर होत असतात वारंवार या बाबतचे पत्रव्यवहार करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दुर्लक्ष का? असा खडसावून सवाल जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी केला. पुढील आठ दिवसात सर्व काम करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

अलिबाग

प्रतिनिधी -ओमकार नागावकर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!