रोहा सारसोली सुरुंग स्फोट प्रकरण , फरारी आरोपींना अटक ; चार दिवसाची पोलीस कोठडी ……


रोहा सारसोली सुरुंग स्फोट प्रकरण , फरारी आरोपींना अटक ; चार दिवसाची पोलीस कोठडी ……

प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा

Advertisement

रोहा तालुक्यातील सारसोली गावालगत ओहल्याचे कातळ फोडण्यासाठी सुरुंग लाऊन कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेतल्याने झालेल्या स्फोटात एका १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला .तर एक ८ वर्षिय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना १४ जून रोजी घडली होती . या दुर्घटनेनंतर रोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुर्घटनेतील फरार आरोपींचा शोध लावण्यात यश आले असून आरोपींना गुरुवार ( दि.२० ) आलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चणेरा भागातील सारसोली गावात १४ जून रोजी सुरुंग स्फोट होऊन खंदार आदिवासी वाडी येथील सुभाष रमेश पवार ( वय १० ) या मुलाचा मृत्यू झाला .आर्यन संजय जाधव ( वय ८ ) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर मंगेश गणेश पवार ( रा . खंदार आदिवासी वाडी – चणेरा ) यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती .जमीन मालक दत्ताराम कृष्णा चाळके व अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या घटनेतील अन्य दोन आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्क वेगाने फिरवत आरोपी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फडकेवाडी या गावात असल्याची माहीती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी सापला रचून दत्तात्रेय जयसिंग यादव व सुभाष लक्ष्मण चव्हाण यांना सोमवार ( दि. १७ ) अटक केली .
या दोन्ही आरोपींना गुरुवार ( दि.२० ) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अरोपींना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद वायंगणकर करीत आहेत .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!