रा. जि.प. सदस्य कै. चांगदेव निरकर यांचे तृतीय वर्ष श्राद्ध .


रोहा तालुका आगरी ज्ञाती समाज्याचे संस्थापक/अध्यक्ष व माजी रा. जि.प. सदस्य कै. चांगदेव निरकर यांचे तृतीय वर्ष श्राद्ध .

प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा

Advertisement

रोहा तालुक्यातील ५२ गाव आगरी ज्ञाती समाज अध्यक्ष माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य तसेच शे.का.पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते कै. चांगदेव सहदेव निरकर यांचे तृतीय वर्ष श्राद्ध विधी धोंडखार येथे करण्यात आले.
राजकारण , सामाजिक कार्यात ते सक्रिय भाग घेत असताना समाजातील बुजूर्ग मंडळींना त्यांचा हेवा वाटत असे.
लहानपणी जास्त करून ते ज्येष्ठांच्या सानिध्यात असायचे त्यातुनच त्यांना मोठ मोठे निर्णय घेण्याचे धाडस अवगत झाले असावेत असेही त्यांच्या शिष्यगणांनाचे मत आहे.
त्यांनी अनेक वर्षे समाज्याची निष्काम सेवा केली. समाज संघटीत करण्यासाठी धोंडखार ते तालुक्यातील वेगवेगळ्या गावी सायकलने प्रवास करत असायचे.
रोहे तालुका ५२ गाव संस्थापक/अध्यक्ष, १३ वर्षे रायगड जिल्हा परिषदेत सदस्य, अनेक वर्षे शे. का. पक्षाचे काम केले , कोकबन येथे जे. बी. सावंत न्यू इंग्लिश स्कूलचे निर्माते, कोकबण येथील शासकीय उपआरोग्य सेवा केंद्र. (रुग्णालयात) बंद अवस्थेत होता तो लोक सहकारातून चालू केला. चणेरा येथील सुडकोळी सहकारी सोसायटीच्या भात गिरणीचे संचालक म्हणून तर धोंडखार गृप ग्राम पंचायत मध्ये सदस्य, आणि सेवा निवृत्त होईपर्यंत धोडखार ते न्हावे या विभागातील विविध सहकारी संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम केले. तसेच गोफण ते साळाव विभागातील पहिले श्री समर्थ बैठकीचे श्रवण हॉल धोंडखार येथे होण्याकरीता मार्गदर्शक म्हणून लाभले.
कै. चांगदेव निरकर यांनी समाज कार्य करत असताना कधीही स्वताचा सार्थ पाहिला नाही. नेहमीच हरतमुख स्वभावाच्या निरकरबाबा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार असुन ते यह लोकांतून निर्वाण पावले. चणेरा विभागातील ग्रामस्थ , रोहा तालुका ज्ञाती मंडळच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!