मोफत नेत्र तपासणी व प्रधानमंत्री आयुष्मान कार्डधारकांचा शिबीरास उत्तम प्रतिसाद


मोफत नेत्र तपासणी व प्रधानमंत्री आयुष्मान कार्डधारकांचा शिबीरास उत्तम प्रतिसाद.

अलिबाग : कै. राजेंद्र नागावकर यांच्या स्मरणार्थ दि. ३ जानेवारी रोजी श्री. पांचाळेश्र्वर मंदिरात मोफत नेत्र तपासणी व प्रधानमंत्री जन अरोग्य आयुष्मान भारत कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक ओमकार नागावकर आणि दैवज्ञ ब्राम्हण समाज रेवदंडा, थेरोंडा, चौल, यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली कार्यक्रम संपन्न झाला. समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीमधील एक मूलभूत घटक आहे. सामाजिक सेवा म्हणजे संघटित कार्यरचना जिच्या मार्फत मुख्यतः सामाजिक संसाधनांचे संवर्धन, संरक्षण व सुधारणा साध्य करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न केले जातात.

Advertisement

आधुनिक राष्ट्रांमधील, विशेषतः विकसनशील देशांतील, जनतेसाठी मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्यत: शासनाने उचलावी असे विचारांनी ओमकार नागावकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. नेत्र तपासणीसाठी सुमारे २५० हून आधी ग्रामस्थांनी लाभ घेतला तर आयुष्मान कार्ड धारकांनी १२५ हून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना शिंदे गट तसेच विद्यमान रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे, श्री पांचाळेश्र्वर मंदिराचे माजी ट्रस्टी डॉ. सुरेश गोरेगावकर, दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष देवानंद पोवळे, दैवज्ञ समाजाचे प्रमुख ट्रस्टी दिपक तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

लाभार्थींचा प्रचंड मोठा प्रतिसाद कार्यक्रमाला मिळाला असून अनेकांनी प्रधानमंत्री जन अरोग्य आयुष्मान भारत कार्डचा लाभ घेतला तर प्रख्यात नत्र चिकित्सक डॉ. सुहास हळदीपुरकर यांच्या मोफत नेत्र तपासणीसाठी देखील उत्तम प्रतिसाद मिळाला.
डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रायगड, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथे काम करीत आहे. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आता पर्यंत १७ लाखाहून जास्त मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत असे दिग्गज डॉ. सुहास हळदीपुरकर यांचे सहकारी डॉ. धनंजय साळुंखे आणि कार्यक्रम प्रमुख मोहन पाटील हे या कार्यक्रमाला लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!