शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अलिबाग शहराची आढावा बैठक संपन्न.


शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अलिबाग शहराची आढावा बैठक संपन्न.

अलिबाग (ओमकार नागावकर) : रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अलिबाग गुरुप्रसाद हॉटेल येथे दि.२३ डिसेंबर रोजी आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, युवासेना जिल्हा अधिकारी अमीर (पिंट्या) ठाकुर, सल्लागार सतीश (बंड्या)पाटिल, प्रवक्ते धनंजय गुरव, विधानसभा प्रमुख कृष्णा कडवे, अलिबाग शहर संपर्क संघटिका तनुजा पेरेकर, शहर प्रमुख संदीप पालकर व आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्ल्युसिव्ह अलायन्स अर्थात INDIA आघाडी देशातील येणाऱ्या सर्व आगामी निवडणूक एकत्रितरित्या लढवणार आहे त्यामुळे परिवर्तन हे निश्चित होणार असून भारतीय जनता पक्षाचे खोटे मुखवटे नक्कीच जनते समोर येतील, झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक विजय हा इंडिया आघाडीचा झाला होता; तर येणाऱ्या १५ ग्रामपंचायती, नगरपालिका, लोकसभा सर्व निवडणुका या INDIA आघाडी मार्फतच लढविण्यात येणार आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी प्रत्येक धर्म, समाज, प्रत्येक व्यक्तीला शिवसेनेशी जोडले त्यामुळेच हा पक्ष इतका कणखर पणे उभा आहे. पक्षाला अजुन बळकट करण्यासाठी आपल्याला एकत्र येवून लढा देणे जास्त गरजेचे आहे पक्ष जरी आज संकटात असला तरी जनता मात्र सुज्ञ आहे ती फक्त निवडणुकांची वाट पाहत आहे. येणाऱ्या निवडणुकांमधून जनताच गद्दारांना त्यांची जागा दाखवून देईल असे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना अलिबाग शहर आढावा बैठकीत सांगितले.

 

 

 

 

 

  1. निर्भीड वार्ता

बातम्या व जाहिराती करता संपर्क साधावा

मिथुन वैद्य

8975220566


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!