बाहे येथे आरोग्य तपासणीला उत्स्पूर्त प्रतिसाद. विविध आजारांवर केली मोफत तपासणी.
बाहे येथे आरोग्य तपासणीला उत्स्पूर्त प्रतिसाद. विविध आजारांवर केली मोफत तपासणी.
प्रतिनिधी सत्यप्रसाद आडाव चणेरा
रोहा तालुक्यात कृषि उत्पन्न क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बाहे येथे कोकण शेतकरी व मजूर सामजिक संस्था रोहा आणि रायगड उपजिल्हा रुग्णालय रोहा यांच्या सौजन्याने विविध आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . याला येथील रुग्णांनी तसेच ग्रामस्थ , नागरीक तथा महिलांनी भरभरुन प्रतिसाद देत याचा लाभ घेतला.
यावेळी कोकण शेतकरी व मजूर सामजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका कांबळे,पत्रकार संदीप सरफले,पत्रकार महादेव सरसंबे,डॉ श्याम लोखंडे, नितीश सकपाळ,निलेश ठमके, नंदकुमार मरवडे, जिल्हा उप रुग्णालय येथील डॉ. सलमा मुजावर,डॉ. साराह डोंगकर, डॉ. नचिकेत पाटील, डॉ. निलेश शेळके, आरोग्य सेविका सुषमा महाडीक, राधिका सानप, औषधे निर्माता एच एल एल संस्थेचे प्रथमेश राणे, सुरज सुरलकर, अनुष्का सिद्धी.तसेच खांब देवकान्हे विभागीय कृषी अधिकारी सारिका सावंत,पल्लवी, रुपाली देवकर, शेतकरी मजूर संस्थेचे भारत खाडे,मुकेश कुंडे,राजेंद्र शिंदे, सुशील खांडेकर,सह आदी तपासनीस आलेले रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पमालिका अर्पण करत अभिवादन करून करण्यात आली.तर सदरच्या आरोग्य तपासणीत उपस्थित रुग्णांची रक्तदाब,मधुमेह, हर्निया, हायड्रोसील, तोंडाचा कर्क रोग,मनोविकार,नेत्रतापासणी, मोती बिंदू, क्षय रोग, आशा विविध प्रकारच्या आजारांवरील तपासणी डॉक्टरांकडून करण्यात आली तसेच त्यांना मोफत यावेळी प्राथमिक औषधोपचार देण्यात आले .
सदरच्या आयोजित शिबिरात मार्गदर्शन करताना संदीप सरफळे यांनी सांगितलं की ग्रामीण भागात असे आरोग्य तपासणी शिबिर घेतले पाहिजे येथील भागातील गरीब गरजू रुग्णांना या अनुषंगाने विविध तपासणी आणि उपचार या शेतकरी मजूर सामजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिबिरातून मिळणार आहेत आणि त्याचा लाभ या नागरिकांनी होत असल्याने सामाजिक स्तरावर या संस्थेचे काम खूप मोलाचे कार्य करत आहे असे सांगितले. तर विभागीय कृषी अधिकारी सारिका सावंत,आणि डॉक्टर यांनी यांनी देखील यावेळी विविध आजारांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी केले तर प्रास्तविक शेतकरी मजूर सामजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका कांबळे यांनी केले तर शेवटी आभार मानून सांगता करण्यात आली.