जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिले एका आठ वर्षीय बालिकेला नवजीवन


जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी

दिले एका आठ वर्षीय बालिकेला नवजीवन

 

रायगड
: इच्छाशक्ती आणि कामाप्रती निष्ठा असेल तर अशक्य असलेली गोष्टही सहज शक्य करता येते. जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास देवमाने दुर्दम्य इच्छाशक्तीसमोर यांच्यासमोर आजाराने देखील हार मानली. एका आठ वर्षीय बालिकेला डॉ देवमाने यांनी नवजीवन दिले आहे.

कु.प्रविका विश्वास शिंदे, 8 वर्ष, चिकलगाव, धोर्जे, ता.म्हसळा हिला 10-15 दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होता आणि 1 आठवड्यापासून ताप येत होता, तिला गेल्या रविवारी म्हसळा येथील एका खाजगी प्रॅक्टिसनरकडे नेण्यात आले होते, तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला देऊन उपचार केले. तेथील ओपीडीच्या आधारे, रुग्णाला दि.26 नोव्हेंबर रोजी USG A+P मिळाला, तिची लक्षणे कायम राहिल्याने त्यांनी म्हसळा येथील खाजगी रुग्णालयात रुग्णाची पुन्हा तपासणी केली जेथे डॉक्टरांनी सीटी स्कॅन, नॉन कॉन्ट्रास्ट सीटी ओटीपोट आणि श्रोणि घेण्याचे सुचवले. सीटी रिपोर्ट (अपेंडिसाइटिससह अॅपेन्डिकोलिथचे निष्कर्ष) डॉक्टरांनी नातेवाईकांना सल्ला दिला की तिची प्रकृती ठीक नाही तिला उच्च केंद्रात ऑपरेशन करावे लागेल, त्यानंतर तिला 30 नोव्हेंबर 23 रोजी रात्री 11:30 वाजता अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तात्काळ पाहणी करून त्यांनी स्वतः तात्काळ त्या मुलीवर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून त्याकरिता भूलतज्ञ यांच्या मदतीने त्या मुलीची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमध्ये सुमारे 300 ते 350 मिली पु (घाण ) तिच्या पोटातून काढण्यात आला.

Advertisement

 

सद्य:स्थितीत ही मुलगी धोक्याच्या बाहेर असून तिची प्रकृती आता बरी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे कु.प्रविका विश्वास शिंदे हिला नवजीवन मिळाले आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरिता डॉ.राजेशा के., डॉ.आनंद हेगडे, भूलतज्ञ डॉ.सुश्मिता बी व शस्त्रक्रिया गृहातील परिचारिका यांचे विशेष सहकार्य लाभले.

रुग्णालय परिसरातील स्वच्छता, रुग्णालयात येणारे रुग्ण व लाभार्थी यांना त्याच्या कामामध्ये तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यशस्वी ठरताना दिसून येत आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये, रुग्णांचे नातेवाईक व सर्व सामान्याजनतेमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने हे स्वतःच सर्जन असल्यामुळे जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे कोविड कालावधीमध्ये बंद पडलेला शस्त्रक्रिया विभाग त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक या पदाचा पदभार संभाळल्यापासून पुन्हा सुरु केला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्यामार्फत रुग्णालयामध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधा अत्यावश्यक रुग्णावरील शस्त्रक्रिया व उपचार, आयसीयू, डायलेसिस, प्रसूती विभाग या रुग्णालयातील विविध विभागामध्ये झपाटयाने सुधारणा होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!