शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आरे बुद्रुक येथे नेत्र तपासणी व मोफत उत्कृष्ट दर्जाचे चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन 


शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आरे बुद्रुक येथे नेत्र तपासणी व मोफत उत्कृष्ट दर्जाचे चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन

दि ०४ डीसें. प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा

Advertisement

तीन लाख गोरगरीबांना मोफत उत्कृष्ट दर्जाचे चष्मे वाटपाचा संकल्प घेत शेतकरी कामगार पक्षाच्या महीला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक बांधीलकी जपत गावागावात नेत्र तपासणी करून चष्मे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे . रोहा तालुक्यातील आरे बुद्रुक येथे तज्ञ नेत्रचिकिस्तक डॉ. अरविंद माटल व डॉ. नंदकुमार म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात नेत्र चिकित्सा करून उत्कृष्ट दर्जेचे चष्मे वाटप करण्यात आले . या उपक्रमात आरे बुद्रुक , कुंभोशी , खातलेवाडी , आरे खुर्द परिसरातील २२२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला .
यावेळी रा.जि. मध्यवर्ती बँक संचालक गणेश मढवी , मुरुड तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष राहील कडू , सरपंच राजेंद्र मळेकर , सदस्य आतिष मळेकर , चेतन शिंदे , पायल मळेकर , गाव कमिटी अध्यक्ष प्रकाश शिंदे , राज जोशी , अमोल शिंगरे , जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाखर , एकनाथ मळेकर , माजी सैनिक अनिल मळेकर , गोपाळ शिंदे , मनोहर पवार , रोहीदास वरवते , दत्ताराम पोंगडे , कीसन पोंगडे , हिराजी कांडणेकर , प्रशांत शिंदे तसेच तरुण व जेष्ठ ग्रामस्थ , महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना चष्म्याचा खर्च न परवडणारा आहे . गोरगरिबांना चष्म्याचा आधार देण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या महीला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील करत आहेतच . तसेच आरे बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये सायकली वाटप , रस्ते , पाणी , घरकुल योजना ही विकासाची कामे शे.का.पक्षाचे सरचिटणीस , आमदार भाई जयंत पाटील , माजी आमदार पंडीतशेठ पाटील , माजी जिल्हापरिषद अध्यक्ष आस्वाद पाटील याच्या नेतृत्वात राबविणार आहोत असे रा.जि. मध्यवर्ती बँक संचालक गणेश मढवी आपल्या भाषणात म्हणाले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि शिंदे यांनी उत्तम प्रकारे केले . या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!