वंध्यत्व निवारण शिबिराचा जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा


वंध्यत्व निवारण शिबिराचा जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा

 

रायगड दि.4 डिसेंबर
: महाराष्ट्र शासन व रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 122 पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत दि.20 नोव्हेंबर ते दि.19 डिसेंबर या पूर्ण महिन्यात प्रत्येक गावात एक वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जनावरांमधील वंध्यत्व निवारणासाठी वंध्यत्व निवारण शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

Advertisement

महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून घोषित केला जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या जनावरांचे वंध्यत्व निवारण करून दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचे सर्व नियोजन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद डॉ.श्यामराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

(निर्भिड वार्ता )
आपल्या हक्काचे व्यासपीठ


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!